Welcome to Pustakmarket !
Home

ज्ञानविस्तार

Book Name : ज्ञानविस्तार
Author : प्रा.डॉ. धनंजय लोखंडे
Publisher : आर्ष पब्लिकेशन्स
ISBN no : 978-93-91090-22-7
Category : Literature
Price: 500.RS
Discount Price : 450 RS

Book description

'ज्ञानविस्तार : संकल्पना आणि उपयोजन' ह्या ग्रंथाची निर्मिती ही अतिशय अभिनंदनीय आणि गौरवशाली घटना आहे. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक आणि सिनेट सदस्य प्रा. डॉ. धनंजय लोखंडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त प्रकाशित होणारा हा ग्रंथ महत्त्वपूर्ण दस्त आहे.
उच्च शिक्षणामध्ये 'ज्ञानविस्तार' हा एक महत्त्वाचा घटक आहे. समाजाप्रती उत्तरदायित्व ज्ञानविस्तार कार्यक्रमातून सिध्द होत असते. सन १९६६ च्या डॉ. एस्. एस्. कोठारी आयोगाच्या अहवालामध्ये पुढील प्रमाणे स्पष्ट उल्लेख आहे.
प्रस्तुत बाबीचा परामर्श घेताना आणि प्रस्तुत ग्रंथातील संदर्भ अभ्यासताना अनेक साम्यस्थळे दिसतात. अशा स्वरूपाचे शैक्षणिक ग्रंथ प्रकाशित होत असतात, परंतु या ग्रंथाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. ग्रामीण भागातून आणि गरीब परिस्थितीमधून उच्च शिक्षणासाठी आलेला युवक ज्ञानविस्तार कार्यक्रमात सहभागी होऊन स्व-विकासावरोवर समाजविकासाचे धडे अनौपचारिक पध्दतीने घेतो आणि समाजऋणात राहून पुढील पिढी घडविण्याचा प्रयत्न करातो, हे निश्चितच अभिमानास्पद आहे.
- प्रा. डॉ. कारभारी काळे
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!