Welcome to Pustakmarket !
Home

मी सावित्री जोतीराव

Book Name : मी सावित्री जोतीराव
Author : कविता मुरुमकर
Publisher : अन्वी पब्लिकेशन्स
ISBN no : 978-93-5566-829-5
Category : Literature
Price: 599.RS
Discount Price : 500 RS

Book description

एकोणिसाव्या शतकाचा भारतीय इतिहास हा अत्यंत संवेदनशील आणि क्रांतीकारी इतिहास आहे. या इतिहासाच्या आशयद्रव्यातून एखादी कलाकृती उभी करणे हे तसे धाडसाचे. या कालखंडातील क्रांतीकारी प्रबोधन कलेच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहचवत असताना 'मी सावित्री जोतीराव' ही कादंबरी मानवतावादी मूल्यांची पेरणी करते. इतिहासातील संघर्ष हा कोणत्याच धर्माचा व जातीपातीचा संघर्ष नव्हता तर तो विधायक आणि विघातक प्रवृत्तींमधील संघर्ष होता. सामाजिक समस्यांना विरोध करताना तत्कालीन सुधारकांचे योगदान विसरता येणार नाही. प्रस्तुत कादंबरी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा क्रांतिकारी व युगप्रवर्तक संघर्ष अधोरेखित करते.

नव्या पिढीला इतिहास पारदर्शीपणे व तटस्थपणे सांगणाऱ्या 'मी सावित्री जोतीराव या कादंबरीची समकालीन प्रस्तुतता प्रखर सामाजिक भान व्यक्त करणारी आहे. एकविसाव्या शतकात धार्मिकता पुन्हा टोकदार होत आहे. एकीकडे विज्ञानवादी होत असताना धार्मिक टोकदारपणा शिगेला पोहोचतोय. महात्मा जोतीराव फुले यांनी बुद्धिवादाचा पुरस्कार करत तर्काच्या कसोटीवर बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेतून धर्माला तपासले आणि मानवतावादी विचारांची प्रतिष्ठापना केली. 'शिक्षण हेच सर्व समस्यांचे उत्तर आहे हा विचार अधोरेखित केला. एकविसाव्या शतकातील विघातक प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करण्यासाठी पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होऊन सर्वधर्मियांनी एक होऊन राष्ट्रबांधणी करणे गरजेचे आहे. धर्मातीत असलेली जोतीरावांची 'निर्मिक' ही संकल्पना वैश्विक पातळीवर पोहोचवून यासंबंधी प्रबोधन होणे तसेच मानवतावाद हा धर्मनिरपेक्ष असू शकतो ही जोतीराव फुले यांची धारणा वैश्विक पातळीवर रुजविणे ही काळाची गरज आहे. प्रस्तुत कादंबरीत ही विचारधारा वैश्विक पातळीवर पोहचविण्याची क्षमता आहे.
- (मलपृष्ठावरून )Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!