Welcome to Pustakmarket !
Home

दळण दळीत्ये

Book Name : दळण दळीत्ये
Author : योगीराज बागूल
Publisher : ग्रंथाली प्रकाशन
ISBN no : 000
Category : Literature
Price: 150.RS
Discount Price : 135 RS

Book description

दळण दळीत्ये हा आईच्या ओव्यांचा संग्रह आईच्या निधनापूर्वी माझ्याकडून तो संकलित झाला इतकीच काय ती माझी भूमिका. मराठी ग्रामीण वाङ्मयातील फार मोठा ऐवज नष्ट होता होता वाचला एवढं मात्र खरं. या संग्रहातील ओव्यांमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओव्यांसारखाच अर्थ आणि तत्त्वज्ञान आहे. हा माझा भ्रम आहे, की सत्य हे वाचून तुम्हीच ठरवावे. बहिणाबाईची दृष्टी आणि प्रतिभा आईपेक्षा सरस आणि विशाल होती हे कृतज्ञतापुर्वक मान्य करुन या संग्रहातील आईच्या ओव्यात जे मातृत्व, जिव्हाळा, तळमळ, कळकळ, स्वामीनिष्ठता, जिद्द, व्याकुळता आणि खानदानीपणा भरलेला आहे तो वाचताना हृदय पिळवटून निघतं एवढं मात्र नक्की. आईला तिच्या कुटुंबीयांची, गोताची किंवा तिच्या बैलजोडीची जितकी काळजी आहे तितकीच तिच्या शेतातील प्राणी आणि पक्षांचीही! म्हणूनच ती एका ओवीत म्हणते

माझ्या मळ्यात येहरं तिथं चिमणीचा खोपा
खोप्यामधल्या जिवाची राखण करी देवबाप्पा
अथवा
गरीब दुबळा भाऊ बहिणीला असावा
बांडी भुरकी चोळी अेका रातीचा इसावा

- योगीराज बागूलPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!