Welcome to Pustakmarket !
Home

इलेक्शन बिलेक्शन

Book Name : इलेक्शन बिलेक्शन
Author : हिरालाल पगडाल
Publisher : अक्षरबंध प्रकाशन
ISBN no : 000
Category : Political
Price: 230.RS
Discount Price : 207 RS

Book description

क्रिकेट सिनेमा आणि राजकारण हे कोणत्याही सर्वसामान्य भारतीय माणसाचे आवडते विषय. या विषयावर बोलताना प्रत्येकजण त्या विषयातील तज्ज्ञ असल्यासारखा भाष्य करतो. मात्र 'इलेक्शन बिलेक्शन या पुस्तकात लेखकाने निवडणुका आणि राजकीय घडामोडींवर अतिशय चिकित्सकपणे आणि अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे.
१९५२ ते २०१९ या सुमारे सत्तर वर्षाचा निवडणुकांचा लेखाजोखा मांडताना लेखक हिरालाल पगडाल यांनी सतरा लोकसभा व पंधरा विधानसभा निवडणुका केंद्रबिंदू मानून है पुस्तक लिहिले आहे. पुस्तकात 'गल्ली से दिल्ली पर्यंतचे अनेक संदर्भ आहेत. केवळ निवडणुकीतील उमेदवारांची नावे, मतदानाची आकडेवारी न देता त्या-त्या निवडणुकीची पाश्र्श्वभूमी विषद करताना लेखकाने जे ऐकले, वाचले आणि बघितले त्या सगळ्याचा सारा पुस्तकात दिसून येतो. निवडणुकीच्या राजकारणात अगदी छोटे-छोटे मुद्दे कमे परिणामकारक ठरतात, हे वाचताना नकळत भारतीय मतदाराचे मानसशास्त्रही उलगडत जाते.Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!