Welcome to Pustakmarket !
Home

वेदनास्पर्श

Book Name : वेदनास्पर्श
Author : धर्मराज निमसरकर
Publisher : नीहारा प्रकाशन
ISBN no : 000
Category : Literature
Price: 120.RS
Discount Price : 108 RS

Book description

प्रिय धर्मराज निमसरकार,

आपल्या कथांचा बाज वेगळा आहे. कुणाला त्या शृंगारिक वाटतील, तर कुणाला विषयप्रधान. पण बाईचं रुप , सौंदर्य शृंगार कुणाला नको आहे ? निसर्गदत्त रुप न्याहळताना दृष्टी मात्र निकोप हवी आहे. प्राजक्ताचं फुलणं आणि सुगंध देणं हे प्रकृती नैसर्गिक होऊ या. पण तेच ओरबडून घेण्यात कुठला आनंद आहे? वान्यावादळाप्रमाणे वेल झोडपण्यात कुठली रसिकता आहे? स्त्रीला छळणं एवढीच रूढ केलेली तिची प्रतिमा. मग शाब्दिक, वाचिक वाम्बाणांनी नाहीतर विषारी नेत्रांनी, भेदक इंगळागत पडणाच्या निखान्यातून तिचा कोळसा करणे तर आवडीचा खेळ आहे. स्त्री म्हणून जन्मावरुन तिच्या जातीवरून स्थळ काळ अथवा प्रसंगाने तिचा कसाही छळ मांडलेला आहे. संशयाचा आणि वासनेचा विळखा तिच्याभोवती पडलेला आहे. त्यात ती गुदमरून गेली आहे. मृत झालेली आहे तरीही तिच्या कलेवरावर धोपाट्या घालीतच आहोत. अशा वेळी आपल्या कथा अंधारात चाचपडणाऱ्या स्त्रियांच्या प्रतिशोध घेणाऱ्या कथा वाटतात. 'मुक्तपण' उपभोगणं म्हटलं तर, वेगळाच संशय घेतला जातो. इतरांना मात्र मुक्तपणाची मोकळीक. तिचं मुक्तपण स्वैराचारात बदफैलीत मोडायला एव्हाना सगळेच रिकामे असतात. तिने जर आपल्या आवडत्या माणसाला 'प्लीज कीस मी म्हटलं तर किती मोठा अनर्थी धर्म, रुदी आणि परंपरांना नाकारणारी एखादीच बोल्ड केली असते ती आपण ताकदीनं उभी केली आहे. कुणाची तरी बायको म्हणून नवऱ्याचे ऐकलेच पाहिजे, असे कां ? तिला ही मन आहे. स्वतंत्र विचार आहेत. तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य का असू नये पुरुषी अहंकाराला स्त्रीचं शरीर सुखही हवं असतं आणि तिचं वैयक्तिक स्वातंत्र्यही हवं असतं. त्यात तिचा आणि तिच्या स्वातंत्र्याचा बळी केव्हा घेतला जातो हे समजत नाही. हिरावल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यासाठी बंड करणारी स्त्री तुम्ही उभी केली आहे हे संग्रहाचं आशास्थान आहे. अत्याचार करणान्याचे सामान कापून त्याच्या हातात देणारी 'सुबी' जेव्हा असा बदला घेते तेव्हा न्यायनिवाडा करणारी व्यवस्था तिला कारावासाची शिक्षा देते. तेव्हा तिला आपल्या भविष्यकाळाच्या अंधाराची तमा नाटत नाही. उलट ती अंधाराला धडका देणारी सौदामिनी वाटते. सर्वच कथामधून आपण असंख्य प्रश्न उभे केले आहेत. आजपर्यंत स्त्री उच्चरवाने बोललेली नाही. तुमच्या नायिका निमूटपणे परिस्थितीला शरण जात नाहीत तर मान वर करून प्रश्न विचारीत आहेत, की ज्यांची उत्तरे इथल्या व्यवस्थेने यायची आहेत.

-योगीराज वाघमारेPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!