Welcome to Pustakmarket !
Home

निळ्या पहाटच्या सूर्यपुत्रांचे अधोरेखित

Book Name : निळ्या पहाटच्या सूर्यपुत्रांचे अधोरेखित
Author : धर्मराज निमसरकर
Publisher : नीहारा प्रकाशन
ISBN no : 000
Category : Literature
Price: 80.RS
Discount Price : 72 RS

Book description

'निळ्या पहाटेच्या सूर्यपुत्रांचे अधोरेखित हा धर्मराज निमसरकरांचा दुसरा कविता संग्रह. सत्तरीच्या दशकात फुले-आंबेडकरी चळवळींच्या जाणिवांची स्पंदने ज्या कवींनी अनेक पातळ्यांवर व्यक्त केली त्या पैकी ते एक महत्त्वाचे कवी. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी निष्ठा है निमसरकरांच्या कवितेचे सूत्रच नव्हे तर वैशिष्ट्य होय. या निष्ठेतून साकार होत जाणारी त्यांची कविता स्पष्ट आणि धीट तर आहेच पण तितकीच भावव्याकुळ व संवेदनाशील आहे. मानवी मनाच्या भाववृत्तीच्या एकाच पातळीवर ती स्थिर न होता अनेक पातळ्यांवर ती डोळसपणे पण तितक्याच हळवेपणाने व्यक्त होताना दिसते. म्हणूनच ती गतिमान व प्रवाही आहे. दुभंगलेपणाची आणि जखमांचा भार सोसणारी त्यांची कविता, नसानसात धुमसणारा ग्रीष्म घेऊन जगणारी त्यांची कविता, पावसाची उत्सुकतेने वाट बघणारी आहे. आशावादी आहे. धर्मराज निमसरकरांच्या कवितेचे जाणवणारे आणखी एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे भविष्याचा वेध घेत वर्तमानात जगणारी आणि जागवणारी त्यांची कविता होय. भूतकाळात रममाण होताना ती दिसत नाही. वर्तमानकालीन संदर्भ आणि वास्तव घेऊन साकारणारी त्यांची कविता सृजनात्मक आणि नवनिर्मितीची स्वप्ने घेऊन जगताना दिसते आणि चिंतनाच्या पातळीवर स्थिरावताना आत्ममग्न न होता ती संवादी होते. या संवादातूनच त्यांच्या कवितेचे प्रतिमाविश्व फुलताना दिसते.
पाय मातीवर आणि मातीला पाय प्रामाणिक असले म्हणजे उन्मळून पडण्याची शक्यता कमी हा आत्मविश्वास घेऊन जगणारी आणि सम्यक् परिवर्तनाचा विश्वास जागवणारी धर्मराज निमसरकरांची कविता आज संग्रहरूपाने साहित्यविश्वात दुसरे पाऊल ठेवीत आहे. फुले-आंबेडकरी विचारांच्या साहित्य चळवळीला गती देण्याचे आणि आपल्या पाऊलखुणा उमटविण्याचे सामर्थ्य निश्चितच त्यांच्या कवितेत आहे.
- अर्जुन डांगळेPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!