Welcome to Pustakmarket !
Home

तमासगीर माणसं

Book Name : तमासगीर माणसं
Author : के. जी. भालेराव
Publisher : सुगावा प्रकाशन
ISBN no : 978-93-84914-93-6
Category : Literature
Price: 130.RS
Discount Price : 110 RS

Book description

के.जी. भालेराव हे मराठी कादंबरी आणि कथा लेखनातील दमदार नाव आहे. स्मशानभूमी (१९९५); सूर्या (२००४) या त्यांच्या कादंबऱ्या मराठी साहित्य समीक्षेत बऱ्याच चर्चिल्या गेल्या आहेत. तसेच भोगी (१९९९) व ;अक्षरांचे भोई ; (२०१५) हे कथासंग्रहही वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत. कॉम्रेड पर्बत नाना (२०१०) हे चरित्र लेखनही त्यांच्या नावावर आहे. याशिवाय समाजमाध्यमात व्यक्तिचित्रणात्मक लेखनाचे अनेक सर्जनशील अविष्कार त्यांच्या लेखनीतून नेहमीच साकारत असतात.
आंबेडकरी जीवननिष्ठा आणि परिवर्तनाची क्रांतिदशी अपेक्षा हे भालेराव यांच्या लेखनाचे गर्भित वैशिष्ट्ये राहिले आहे. या अर्थाने रंजनवादी लेखनाची तटबंदी तोडून त्यांचे लेखन वास्तवतेच्या अनुभवाने जीवनवादी बनले आहे. ;तमासगीर माणसं; हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक उपेक्षित लोककलावंतांच्या जगण्यातले दारिद्रय आणि कलेची श्रीमंती मांडणारे आहे. वाचक या पुस्तकाचे नक्की स्वागत करतील अशी अपेक्षा आहे. (मलपृष्ठावरुन)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!