Welcome to Pustakmarket !
Home

फेसाटी

Book Name : फेसाटी
Author : नवनाथ गोरे
Publisher : अक्षरवाङ्मय प्रकाशन, पुणे,(2019), पाने - 192
ISBN no : 978-93-84470-28-9
Category : Literature
Price: 260.RS
Discount Price : 234 RS

Book description

आजची मराठी कादंबरी अनेकस्तरीय जीवनानुभवामुळे समृद्ध आहे. समाजजीवनातील अनेकस्तरीय वाटा, उपवाटांचे कथन तीमधून ध्वनित होत आहे. 'फेसाटी' या कादंबरीत पशूपालक, अल्पभूधारक शेतीसमूहातील तरुणाच्या संघर्षाची कथा साकारली आहे. नाथा गोरे या तरुणाच्या महाविद्यालयीन काळापर्यंतचा जीवनप्रवास या कादंबरीतून सांगितला आहे. ही जीवनकथा केवळ नकोशा शिक्षणव्यवस्थेपुरती सीमित नाही; तर त्यास अनेक कंगोरे आहेत. 'स्व'च्या शिक्षणप्रवासाबरोबरच कुटुंब आणि समाजातल्या अनेक महापेचांना ती साकार करते. दारिद्र्याचा शाप भाळी ल्यालेल्या आणि कर्जाच्या निरंतर सावटाखाली जखडलेल्या समाजाचे चित्र या जीवनकथेत समांतरपणे वाहते ठेवले आहे. गतविस्मृत ताईच्या गोठवलेल्या अपराधभावाच्या बोचणीतून या जीवनानुभवाला विवेकाचा स्वर प्राप्त झाला आहे. खेड्यातील व्यक्ती-समूहाची व्याधिकथा म्हणूनही तिला असाधारण महत्त्व आहे.
हा समाजपट सुंबरानच्या आख्यानरूपात गुंफला आहे. अतिशय ओघवत्या प्रवाही गद्याचे नितांत सुंदर परिमाण या गद्यकथेस आहे. गोष्टीवेल्हाळ आत्मपरता आणि वैशिष्ट्यपूर्ण संवाद व 'जत' परिसर बोलीची सहजता या कथनास आहे. 'जातु माझ्या मागाला, जातु माझ्या गावाला', 'सांगतु म्या जनाला' या दृष्टीने ही कथा सांगितली आहे. सगळीकडचं वडं तुडुंब भरून वाहणारा भरघोस कथनऐवज तीमध्ये आहे. 'जवारी गई', 'शिंगरी', 'करडं', 'जुंधळ', 'येलतार' अशा अगणित शब्दरूपांनी या कथनाला सजीव बनविले आहे. अल्पाक्षरी शब्दबंधांनी सजविलेले हे गद्य आहे. व्यक्ती, समाज, भू-जैविक वैशिष्ट्ये आणि वर्तमान पेच साकारणारे नाथासुंबरानख्यान वैशिष्ट्यपूर्ण ठरेल. - प्रा. रणधीर शिंदेPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!