Welcome to Pustakmarket !
Home

सनातन

Book Name : सनातन
Author : शरणकुमार लिंबाळे
Publisher : दिलीपराज प्रकाशन
ISBN no : 978-93-84-171-03-2
Category : Literature
Price: 260.RS
Discount Price : 250 RS

Book description

माझं लेखन किती जणांना आवडेल, हे माहीत नाही. कोणाला आवडावं किंवा नावडावं म्हणून मी लेखन करत नाही. माझ्या विवेकाला जे भावेल, तेच मी व्यक्त करतो. माझा विवेक म्हणजे प्रयोगशाळा आहे. भारतीय संस्कृतीच्या मुशीतून माझा विवेक निर्माण झाला आहे. भारतीय संस्कृती म्हणजे भारतातल्या सर्व धर्मीयांच्या आणि निधर्मीयांच्या सहजीवनाचं एकात्म संवेदनशील रसायन होय. कोण्या एका धर्माविषयी बोलणे म्हणजे संपूर्ण भारताविषयी बोलणे नव्हे. ही कादंबरी प्रामुख्याने दलितांविषयी बोलते. सर्वच धर्मानी, प्रदेशांनी, भाषा आणि संस्कृतींनी दलितांना सहजीवनापासून अलिप्त ठेवले. त्यांचा विटाळ मानला. त्यांना भेदभावाने वागवले. दलित वेगळे पडले आहेत. हा वेगळेपणा ह्या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भेदभावाविरुद्ध व्यक्त झालेला हा स्वाभाविक उद्गार आहे. वेगळेपणाचे उद्गार वाढले, तर यजमान संस्कृतीला धोका संभवतो- हा संदेश देण्याचा प्रयत्न आहे. व्यापक सामाजिक हिताचे भान बाळगणे म्हणजेच भूत-भविष्याची मांडणी करणे होय. इतिहासाच्या काल्पनिक आधाराने एक जळजळते वर्तमान सांगण्याचा केलेला हा प्रयत्न आहे.
- शरणकुमार लिंबाळेPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!