Welcome to Pustakmarket !
Home

वासाहतिक महाराष्ट्रातील शेतकरी संघर्षातील समूहभान

Book Name : वासाहतिक महाराष्ट्रातील शेतकरी संघर्षातील समूहभान
Author : उमेश बगाडे
Publisher : हरिती पब्लिकेशन्स्,(२०१७) पाने - ८८
ISBN no : ९७८-८१-९३३२११-७-१
Category : Social
Price: 70.RS
Discount Price : 63 RS

Book description

कार्ल मार्क्सने शेतकरी समूहाला बटाट्याची गोणी म्हटले होते. त्याच्या ह्या विधानालाही काही घटकांनी सार्वत्रीक सत्य मानले. भारतातील शेतकरी हा व्यक्तींचा समूह आहे की जाती-जमातींचा? असा साधा प्रश्नही त्यांना झापडबंदपणामुळे पडला नाही. परिणामी भारतीय संदर्भात शेतकरी वर्गभान घडवण्याचा यक्ष प्रश्न डावलून शेतकरी चळवळींचा प्रवास होत राहिला. उमेश बगाडे यांची मांडणी नेमक्या याच यक्ष प्रश्नाला भिडते व हेच तिचे अनन्य वैशिष्ट्य आहे. जात-जमातीय एकसंघीयतेची कक्षा, राष्ट्रवादी चळवळ, साम्यवादी धुरीणत्व, आंबेडकरांचे नेतृत्व व सत्यशोधक विचारांच्या मुशीत झालेल्या शेतकरी विद्रोहांचा वेध घेत ही मांडणी शेतकरी समूहजाणीवेचे अनेक पदर उलगडते. जात पितृसत्तेच्या रचनेत शेतकरी संघर्षांचा विस्तार हा जाती जमातीच्या पायावर आडवा विस्तारत जातो, तर एकपितृसंघीय समुदायसत्तेच्या रचनेत तो आडव्या विस्ताराची मर्यादा लांघून उभाही विस्तारताना दिसतो. अगदी फुले-आंबेडकरी मुशीत झालेल्या शेतकरी लढ्यांनाही ही संरचनात्मक मर्यादा असली तरी, त्यांच्या कडव्या जातीव्यवस्था विरोधी भूमिकेतच या पेचावर मात करण्याच्या शक्यता धुंडाळणारा गंभीर सैद्धांतिक प्रयत्न या मांडणीचा गाभा आहे. त्यामुळेच हे पुस्तक सामाजिक परिवर्तन प्रकल्पाची झालेली कुंठीतता भेदणाऱ्या संवादाच्या नव्या वाटा नक्कीच मोकळ्या करेल अशी खात्री वाटते. ....(पुस्तकातून)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!