Welcome to Pustakmarket !
Home

असो आता चाड

Book Name : असो आता चाड
Author : संदीप शिवाजीराव जगदाळे
Publisher : लोकवाङ्मय गृह(२०१९) पाने - ९२
ISBN no : ९७८-९३-८२९०६-५७-५
Category : Literature
Price: 150.RS
Discount Price : 135 RS

Book description

माती, नाती आणि भवताल हे संदीप जगदाळे यांच्या कवितेचं भावविश्व आहे. मातीत जन्मणं, मातीपासून तुटणं आणि पुन्हा मातीत रुजणं या प्रवासातील वेदनादायी, दुःखदायक प्रवास म्हणजे ही कविता आहे. अनुभवातून जाताना आणि जगण्याला भट्टीत टाकून वितळवताना जी आंतरिक घालमेल, क्रियाप्रतिक्रियांच्या जंगलातून होणारं मन्वंतर म्हणजे ही कविता आहे. या मन्वंतराच्या प्रवासातील श्वासनिःश्वासांची आंदोलनं शब्दांत पकडण्याचा प्रयत्न हा कवी करतो.
दर्शनी सुलभ तरीही चक्रव्यूहात खेचणारी आणि वाचणाऱ्याचा जीव गुदमरून टाकणारी ही कविता आहे. धरणं होतात, माणसं विस्थापित होतात, पण त्यांच्या पायाला चिकटलेली जमीन ज्या हाका घालते त्या हाकांचे दीर्घ स्वर या कवितेत ऐकू येतात. त्या हाकांच्या आवर्तनाने आपण बधीर तर होतोच, पण त्याबरोबरच आपल्या अस्तित्वाचा सजग शोध घेण्यास आपण प्रवृत्त होतो. अशी ही जगण्याला शोधायला लावणारी कविता आहे. या जगण्यावर अनेक कादंबऱ्या झाल्या, कविताही झाल्या आणि कथा तर बऱ्याच, पण या अनुभवातून गेलेल्या माणसानं लिहिलेले शब्द महत्त्वाचे आहेत. विस्थापित होणं, मास्तर असणं यावर बाहेरून बांधावर उभं राहून लिहिणं वेगळं आणि त्या चरख्यातून स्वतःला पिळवटून काढताना शब्दांतून व्यक्त होणं खचितच वेगळं. संदीप जगदाळे या सगळ्या चरख्यातून पिळून निघालेला आणि कवी असणारा माणूस आहे. त्यामुळे त्याच्या शब्दांत सगळ्या विस्थापनाची पाळमुळे आहेत. त्याची कविता आपल्याला मरणयातनांच्या निबिड गुहेतून प्रवास करायला लावून विचारसन्मुख करते, हेच या कवितेचं यश आहे. या कवितेत प्रतिमाप्रतिकांना जागा नाही. अनुभवालाच प्रतिमाप्रतिकांचं सामर्थ्य प्राप्त करून देण्याची नवी शक्यता या कवीने शोधलेली आहे. त्यामुळे हा कवी पांडित्यप्रचुरतेला फाट्यावर मारतो. शब्दाला काटेफडाच्या बोंडाचं अस्तित्व बहाल करतो. काटेफडाचं बोंड तीक्ष्ण काट्यांनी भरलेलं असतं, पण ते काटे वेगळे करून गराला भिडलं की अप्रतिम गोडव्याचं आयुर्वेदिक सत्व देणारं औषध प्राप्त होतं. अशीच ही कविता आहे. ही कविता समजून घेताना स्वतःला विस्तारित करण्याची अट अनिवार्य आहे. या कवितेला उज्ज्वल भविष्य आहे, कवीने स्वतःला स्खलनापासून वाचवलं तर !
- राजन गवसPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!