Welcome to Pustakmarket !
Home

पीळ

Book Name : पीळ
Author : सुनील यावलीकर
Publisher : मीडिया वॉच पब्लिकेशन (२०१८), पाने - ११३
ISBN no : 978-81-937823-2-3
Category : Literature
Price: 100.RS
Discount Price : 90 RS

Book description

खळखळ झरा वाहतो. पारदर्शक. तळातील, दगड गोटे लख्ख पाहून घ्यावे. त्यांचे रंगरुप, आकार, ऊकार डोळ्यात साठवून घ्यावे. सुनीलच्या काव्यप्रवाहाचही तसंच. शब्दाशब्दातून भावभावनांचं नितळ प्रतिबिंब अभिव्यक्त होत जाणारं.
एकूणच सारं मनस्वी. थेट काळजाला भिडणारं. दिखाऊ दांभिकतेला जाळणारं. झोडणारं. भंगत, दुभंगत चाललेल्या सामाजिकतेचं हिडीस वास्तव रेखाटणारं. शब्दातूनही अस्वस्थ करणारी वैचारिक चित्र रंगवणारं. भावभावनांची आंदोलनं आपल्याही मनात तरंगती ठेवणारं. अरे, हे आपण का लिहिलं नाही अशी रुखरुख चटका लावणारं. एकूणच हे लेखन आपलच वाटायला लावणारं. संवेदनशील मनाशी असं अद्वैत साधणारं. - विठ्ठल वाघPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!