Welcome to Pustakmarket !
Home

समईच्या शुभ्र कळ्या

Book Name : समईच्या शुभ्र कळ्या
Author : अनघा कारखानीस
Publisher : चपराक प्रकाशन (२०२०), पाने - १०४
ISBN no : 9789386421159
Category : Literature
Price: 120.RS
Discount Price : 108 RS

Book description

आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात घालवल्यानंतर लेखिकेने अनेक अनुभव या पुस्तकात नमूद केले आहेत. ज्या शाळेतील अनुभव त्यांनी सांगितले आहेत ती शाळा दुर्बल आणि वंचित घटकांसाठीच्या शाळेतील आहे. शिक्षण हे परिवर्तनाचे साधन आहे याची जाण असणारे शिक्षक आणि मार्गदर्शक शाळेत उपलब्ध असतील तर अनेकांचे संसार उभे राहू शकतात. अनेकांच्या घरात ज्ञानाचे दीप उजळू शकतात आणि जीवनमान सुसह्य होऊ शकते हे या पुस्तकातील प्रत्येक पानातून दिसून येते.
शाळेचे प्रांगण घरापर्यंत आणि घराचे प्रांगण शाळेपर्यंत पसरलेले असेल तरच हे होऊ शकते. प्रत्येकाचे भावनिक विश्व वेगळे असते. त्या विश्वाचा सहअनुभव आला की उत्थानाची दिशा ठरवता येते. कमकुवत क्षणाला समृद्ध करून त्या व्यक्तिचे असामान्यत्व फुलवता येते. आज आजुबाजूला अशी परिस्थिती आणि माणसे असतील तर अशी उजळलेली जीवने आपल्याला पहावयास मिळतील. या पुस्तकातील अनेक उदाहरणांतून अनेकांना प्रेरणा मिळेल. - इंद्रजित देशमुखPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!