Welcome to Pustakmarket !
Home

भीमक्रांतीचे पडघम

Book Name : भीमक्रांतीचे पडघम
Author : संपादन : बुद्धभूषण साळवे
Publisher : अक्षर प्रकाशन(२०१९), पाने - १३१
ISBN no : 978-93-5361-927-5
Category : Literature
Price: 150.RS
Discount Price : 135 RS

Book description

उजेडाच्या महाकाव्याला आणि पुनर्रचनेच्या विश्वासू नीतीप्रबंधालाच दुनिया आता बाबासाहेब म्हणते. जीवनाच्या नव्या सौंदर्यविज्ञानाला आणि असीम प्रज्ञा झालेल्या विश्वव्यापी करुणेला खुद्द जीवनच आता बाबासाहेब म्हणते. 'बाबासाहेब' हाच माझा खरा परिचय आहे असे स्वत: क्रांतीच गौरवाने सांगते आणि जातीविहीन, वंशविहीन, वर्गविहीन, धर्मविहीन आणि लिंगभावविहीन मानवी जीवनाचे दार उघडून देणाऱ्या प्रकल्पाला लोकही आता बाबासाहेबच म्हणतात. आंबेडकर या अनंत शक्यतांकित संज्ञेमुळे उजेडाची एक नवी भाषा आणि प्रज्ञानाची नवी लिपी दुनियेत सुरू झाली. या आविष्कारातून आता समान न्यायाचा आणि संघर्षशील सर्जनाचा मुक्तपिसारा नवनव्याने उगवतो आहे. म्हणून जगात सर्वात जास्त कविता बाबासाहेबांच्या अंतरिक्षाएवढ्या काळजावर लिहिल्या गेल्या आहेत. कोणासाठीही यापूर्वी किनारे नसलेले असे कवितांचे झाड उद्रेकून आले नाही. जीवनाच्या अर्थपूर्णतेची नवनवी क्षितिजे उघडून देणारे भीमप्रज्ञेचे आणि भीमक्रांतीचे पडघम जगात अपूर्वच आहेत. बुद्धभूषण साळवेंनी त्यातले काही पडघम या संकलनात गुंफले आहेत. त्यांना साभिनंदन धन्यवाद आणि सदिच्छा ! - यशवंत मनोहरPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!