Welcome to Pustakmarket !
Home

अग्निपरीक्षेचे वेळापत्रक

Book Name : अग्निपरीक्षेचे वेळापत्रक
Author : यशवंत मनोहर
Publisher : वर्णमुद्रा पब्लिशर्स, 2021
ISBN no : 978-81-950611-0-5
Category : Literature
Price: 454.RS
Discount Price : 400 RS

Book description

अग्निपरीक्षेचे वेळापत्रक या कवितासंग्रहातील निर्मितीप्रक्रिया लोकविलक्षणच आहे. कवी कशासाठी कविता लिहितो? या प्रश्नांच्या अनुषंगाने कवीची अनिवार्य प्रतिबद्धता या कवितांमधून प्रकटते. मनोहरांची कविता अधिकाधिक निर्दोष होत जाणाऱ्या मानवी जीवनाचा पर्याय मांडते. जीवनाचा तळ ढवळून ही कविता माणसाला त्याच्या मूळ अस्तित्वसौंदर्याशी जोडते. माणसाचे कुठल्याही पातळीवरचे अवमूल्यन सहन न करणारी ही कविता मानवी सौहार्दाचा अवकाश अधिकाधिक उज्ज्वल करीत जाते. बंधुता आणि भगिनीता या दोन पंखांनी उडत ती मानवी साकल्याच्या वाटा प्रशस्त करते. हिंसेला कुठेही थारा न देता ही कविता संवादाचे, समतोलाचे आणि सलोख्याचे सौंदर्यविश्व उभे करते.
विज्ञाननिष्ठेच्या हाताने माणसांमधील परस्परोपकारक नात्याचे सर्जन करणारी ही कविता माणसालाच सर्व शक्यतांची उगमभूमी मानते. ही कविता पूर्ण इहवादी आहे म्हणूनच ती मानवी स्वातंत्र्य विद्रुप करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध निर्णायक संग्राम पुकारते. लोकांची मानसिक गुलामी अवाधित राखण्यासाठी शोषकवर्ग आपल्या तत्त्वव्यू हाची भाषाही घडवतो. ही भाषा मुठभर अभिजनांच्या हिताचा काव्यविचार मांडते. यशवंत मनोहरांनी ही भाषा नाकारून नवी इहवादकेंद्री भाषा घडवली. माणसांत इनबिल्ट असणाऱ्या सौंदर्यभावनेतूनच तिचा उदय झालेला आहे. ही कविता माणसाची सद्सद्विवेकबुद्धी प्रज्वलित करते. म्हणूनच ही कविता व्यवस्थेला तिच्या तत्त्वव्यूहासकट तिच्या भाषेलाही नाकारते. मनोहरांच्या प्रतिभेचा आस्थापरीघ असीमच आहे. त्यामुळेच ही प्रतिभा नव्या इहवादी नायकाचा, नव्या इहवादी कवितेचा आणि नव्या इहवादी जीवनसौंदर्याचा नवा दिवस घेऊन आलेली आहे. वाचकांच्या मनातही हा नवा दिवस ती घेऊन जाईल ही खात्री मला आहे.

-दागो काळेPlease log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!