Welcome to Pustakmarket !
Home

आनंदवनातील बाबाशाही

Book Name : आनंदवनातील बाबाशाही
Author : मनोहर पाटील
Publisher : सनय प्रकाशन, 2020
ISBN no : 978-93-84600-71-6
Category : Ideological
Price: 130.RS
Discount Price : 115 RS

Book description

कुष्ठरोगाचा प्रश्न हा आर्थिक विषमतेशी निगडित असलेला प्रश्न आहे. दारिद्र्यात जन्माला आलेल्या आणि कुपोषणाला बळी पडलेल्या माणसांनाच बहुतांशी कुष्ठरोग होतो. याचा अर्थ हा आहे की, कुष्ठरोगाविरुद्धचा लढा हा मूलतः आर्थिक विषमतेविसरुद्धचा लढा आहे. पण आमटे बाबा असा कोणताही लढा लढले नाहीत किंवा त्यांनी असा लढा लढणार्यांना प्रोत्साहनही दिले नाही. त्यांनी भोपालपट्टणम् - इंचमपल्ली धरणाविसुद्ध आवाज उठविला. नर्मदा बचाव आंदोलनात उडी घेतली. भारत जोडों आंदोलन करून पृथ्वी प्रदक्षिणा घातली. पण आर्थिक विषमतेविरुद्धचे कोणतेही आंदोलन केले नाही. विचार करू शकणाऱ्या लोकांना ही गोष्ट अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट अशी की, आमटे बाबांनी वेळोवेळी कैक प्रकल्पाची पिल्ले सोडली... पण कधी कुष्ठरोगावर गुणकारी औषध शोधणाऱ्या विज्ञानशाळेची निर्मिती केली नाही. हा प्रकल्प खर्चीक खरा... पण लोकांनी यासाठी मदत केली नसती काय? नाहीतरी आनंदवन देशी-परदेशी मदतीशिवाय चालते काय? वैषम्य याचे आहे की, असे करण्याचे त्यांच्या मनातही आले नाही.
(मलपृष्ठावरून)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!