Welcome to Pustakmarket !
Home

एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई

Book Name : एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई
Author : डॉ. आ. ह. साळुंखे
Publisher : लोकायत प्रकाशन(२०१९), पाने – ४८
ISBN no : ९७८-९३-५४०९१-००-२
Category : Historical
Price: 50.RS
Discount Price : 45 RS

Book description

एकलव्याचे कौशल्य पाहून द्रोणांचे शिष्य लज्जित झाले, असे महाभारताने म्हटले आहे. याचा अर्थ द्रोणांनी आपल्या शिष्यांना प्रत्यक्ष रीत्या जे ज्ञान दिले होते, त्यापेक्षा अधिक ज्ञान एकलव्याकडे होते. द्रोणांनी आपले सर्वस्व ओतून आपल्या शिष्यांना आणि विशेषतः अर्जुनाला जे ज्ञान दिले होते, त्यापेक्षाही सरस ज्ञान एकलव्याने प्राप्त केले होते. याचा अर्थ स्पष्ट आहे. द्रोणांनी एकलव्याला ज्ञान दिले नाही आणि इतर शिष्यांना आपली गुणवत्ता पणाला लावून शिकविले. एकलव्य द्रोणांच्या शिष्यांपेक्षा वरचढ झाला, याचा अर्थ त्याची गुणवत्ता त्या सर्वांपेक्षा उच्च दर्जाची होती, हे यातून सिद्ध झाले. पण यातून एवढेच सिद्ध झाले असे नाही. द्रोणांची शिक्षक म्हणून जी गुणवत्ता होती, तिच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह लागले, हे कोणाला नाकारता येणार नाही. एकलव्याने स्वयं-अध्ययनाच्या मार्गाने ज्ञान प्राप्त केलेले असो अथवा निषाद गुरूंकडून ते प्राप्त केलेले असो, त्याच्या ज्ञानाचा उगमस्रोत द्रोणापेक्षा गुणवतेच्या व कार्यक्षमतेच्या बाबतीत सरस होता, हे यातून स्पष्टपणे सूचित होते. ...(पुस्तकातून)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!