महाराष्ट्रातील ख्यातनाम आंबेडकरवादी विचारवंत आणि दलित साहित्य चळवळीचे प्रवर्तक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे मराठी साहित्यातील आणि मराठी नियतकालिकाच्या इतिहासातील अपूर्व योगदान सर्वज्ञात आहे. त्यांच्या या कार्यासंबंधीचा कृतज्ञताभाव व्यक्त करणारा हा ग्रंथ आहे. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या व्यक्तिमत्वातील निरनिराळे पैलू उलगडुन दाखवितानाच साहित्य, समाज, शिक्षण आणि संस्कृती या संबंधीचे मौलिक चिंतन अभ्यासकानी या ग्रंथात नोंदविले आहे. समाज परिवर्तनाच्या चळवळीतील आणि साहित्य चळवळीतील कार्यकर्ते आणि अभ्यासक यांना मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरू शकेल असा हा संग्राह्य संदर्भ ग्रंथ आहे. ...(पुस्तकातून)