Welcome to Pustakmarket !
Home

अग्निपंख

Book Name : अग्निपंख
Author : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, सहाय्यक- अरुण तिवारी, अनुवाद- माधुरी शानभाग
Publisher : राजहंस प्रकाशन प्रा. लि., २०१८, पाने- १७६
ISBN no : 978-81-7434-907-1
Category : BIOGRAPHY
Price: 220.RS
Discount Price : 198 RS

Book description

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हाताखाली मी गेली दहा वर्षे काम करत आहे. त्यामुळे मी त्यांचा चरित्रकार बनण्यासाठी कदाचित लायक नसेन आणि माझा तसा हेतूही नव्हता. एक दिवस त्यांच्याशी बोलताना मी त्यांना विचारले, “तरुण भारतीयांना तुम्हाला काही सांगायचे आहे का?” त्यांचे संदेश देणारे उत्तर मला फार भावले. त्यानंतर एकदा धैर्य एकवटून मी त्यांना त्यांच्या पूर्वजीवनाच्या आठवणींबद्दल विचारणा केली, त्या कालौघात लुप्त होण्यापूर्वी शब्दबद्ध करायची इच्छा व्यक्त केली.
मग रात्री उशिरा आणि अगदी पहाटे तारे मावळताना आमच्या एकत्र बैठकांची सुरवात झाली. त्यांच्या अठरा तासांच्या, कामाने गच्च भरलेल्या वेळापत्रकातून आम्ही कसेतरी हे जमवले. त्यांच्या कल्पनांची भरारी आणि सखोलता मला मंत्रमुग्ध करत होती. त्यांच्यामध्ये प्रचंड जीवनेच्छा वास करत आहे आणि त्यामुळेच कल्पनेच्या साम्राज्यात विहार करणे त्यांना आनंद देते. त्यांचे बोलणे समजणे नेहमीच सोपे जाई, असे नाही; पण ते खूप उत्साहवर्धक अन् ताजेतवाने वाटे. काही वेळा ते सरमिसळ झालेले, मार्मिक वा अलंकारिक असे बोलत; पण सावकाश त्यांच्या मनातुन बाहर उसळणाऱ्या आठवणीना, विचारांना सलग असा अघि आला.
मी हे पुस्तक लिहायला बसलो, तेव्हा वाटले, की त्यासाठी माझ्यापेक्षा अधिक ताकदीच्या माणसाची गरज आहे. पण एकदा या कठीण कार्याची कल्पना आली, नीट आकलन झाले आणि या चरित्राचे लेखन करायचा सन्मान मिळाला, याबद्दल आनंद झाला. हे कार्य पूर्ण करण्यासाठी मला धीर मिळू दे, तेवढी कुवत येऊ दे, अशी मी प्रार्थना केली.
सर्वसामान्य भारतीयांसाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. त्यांच्याबद्दल डॉ. कलामना आत्मीयता वाटते आणि ते त्यांपैकी एक आहेत. सर्वसामान्य, साध्या, विनम्र माणसांशी त्यांच्या मनाची तार सहजपणे जुळते. त्यांच्या स्वत:च्या साधेपणाची आणि आंतरिक, धार्मिक वृत्तीची ही खूण आहे...
मला हे पुस्तक लिहिताना मी पवित्र तीर्थक्षेत्री जातो आहे, असे वाटले.Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!