Welcome to Pustakmarket !
Home

संयुक्त आघाडीतून स्थिर सरकारकडे (USED)

Book Name : संयुक्त आघाडीतून स्थिर सरकारकडे (USED)
Author : वा. दा. रानडे
Publisher : सुगावा प्रकाशन, (२०००) पाने – ११५
ISBN no : ८१-८६१८२-५४-३
Category : Political
Price: 60.RS
Discount Price : 30 RS

Book description

संयुक्त आघाडीची कल्पना मानवी जीवनात नवीन नाही. फक्त तो शब्दप्रयोग आपण वापरत नाही. एखादे काम पुरे करण्यास, आपल्या शत्रूशी किंवा संकटाशी सामना करण्यास आपल्या एकट्याचे बळ अपुरे पडत आहे, असे वाटते, तेव्हा दुसऱ्याचे सहकार्य आपण घेतो आणि आपले उद्दिष्ट यशस्वीपणे पार पाडतो. हे सहकार्य म्हणजे वैयक्तिक पातळीवरचा संयुक्त आघाडीचाच प्रयोग असतो. विशिष्ट घटनेपुरता किंवा प्रसंगापुरता तो असला तरी समविचारी व्यक्ती त्यामुळे एकत्र येतात व सहकार्याने कार्य करण्याची वृत्ती त्यांच्यात निर्माण होते. जीवनात अशा सहकार्याची फार आवश्यकता असते आणि केवळ अडचणीपुरतेच एकत्र न येता नेहमीच एकमेकांशी संपर्क ठेवून आपला विकास एकमेकांच्या सहकार्याने साधावा, ही वृत्ती त्यातून जोपासली जाते. आपल्या शिक्षणात बालपणापासूनच त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावयास हवे. ...(पुस्तकातून)Please log in to write a review.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!