Here will play sample audio !..
महाराष्ट्र शासनाच्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य ऑनलाईन करणाऱ्या अभिनव उपक्रमा अंतर्गत मास्तर ही कादंबरी ऑडिओ स्वरुपात सादर करीत आहोत.
१९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात अनेक तरुण मंडळी स्वातंत्र्यलढ्यात उतरलेली अण्णा भाऊंनी पाहिली आणि स्वत:ही त्यात उतरले. पुढे सरकारविरुद्ध बंड पुकारल्याने त्यांना फरारी घोषित केले. तरीही मास्तर अनेक तरुणांना मार्गदर्शन करीतच राहिले. 'मास्तर'ची भूमिका रेखाटताना अण्णा भाऊंच्या विचारांचीच वीण घट्ट होते. देशाला स्वातंत्र्य मिळावं, जनता सुखी व्हावी, दारिद्र्य नष्ट सन्मानाने जगता यावं, ही भूमिका घेऊन मास्तर ही व्यक्तिरेखा कादंबरीत उभी केली आहे.