Here will play sample audio !..
आंध्र प्रदेशातील चितूर जिल्ह्यात मदनपल्ली या गावी जिद्दू कृष्णमूर्ती यांचा जन्म १९ मे १८९५ रोजी झाला. जगातील अनेक विचारवंत व तत्ववेत्त्यांपैकी एक. त्यांनी जीवनविषयक विचार अभिव्यक्त केले. स्वतंत्र विचारसरणी हा त्यांचा स्थायीभाव प्रेम' हा कृष्णजींच्या विचारांचा आत्मा, भीती, लोभ, वासना, क्रोध, हिंसा या भावनांचा ते शोध घ्यायला सांगतात. कृष्णमूर्ती मुक्त शिक्षणाचा आग्रह धरतात. पदव्यांच्या ओझ्याने दबून न जाता शिक्षणामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडविणारे व जगावे कसे? हे शिकविणारे खरे शिक्षण असे त्यांचे मत आहे.