Welcome to Pustakmarket !
Home

पुस्तक परिचय : दलित पँथर - अर्जुन डांगळे

Image


Author of this audio is डॉ. मिलिंद कसबे
Publisher : MK Infoedutch Pvt. Ltd.    ISBN no : 00000
Price: 0.RS   

Here will play sample audio !..


Book Description

या ग्रंथात दलित पँथरची स्थापना आणि पूर्वपरिस्थिती, सत्तरच्या दशकातली दलित साहित्य आणि चळवळीतली दाहकता, पँथरची फाटाफुट, नामांतर तसेच नामदेव ढसाळ - राजा ढाले आणि इतर समकालीनांचे वैचारिक टकराव, साधनातील वादग्रस्त लेखन अशा अनेक गोष्टींची बारकाईने नोंद आहे. अर्जुन डांगळे यांनी या नोंदींना परिशिष्टात साधार संदर्भ दिले आहेत.
या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या ग्रंथात अर्जुन डांगळे यांनी आपली बांधिलकी, वैचारिक निष्ठा आणि त्यांच्या राजकीय भूमिका स्पष्ट केल्या आहेत. याशिवाय दलित साहित्यात पुन्हा पुन्हा चघळल्या गेलेल्या वादांनाही त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. दलित साहित्याला इतर नामविधान देण्याऐवजी दलित संज्ञेत ठाशीव दाहकता आहे, ती व्यापक व रूढ आहे असे डांगळे यांनी सूचित केले आहे. दलितांच्या वैचारिक सांस्कृतिक प्रवासात त्यांनी समाजवादी, मार्क्सवादी आणि इतर समविचारी विचारसरणींशी मैत्रभाव केल्याशिवाय आजच्या संघर्षात उद्याचे प्रागतिक सांस्कृतिक भविष्य नाही असे जे सूचन केले आहे ते सर्वच विवेकी माणसांसाठी महत्त्वाचे आहे.


Do you want to publish Book/E-book/Event?
image
Contact us!