Here will play sample audio !..
बुद्धाला ज्या क्षणाला ज्ञानप्राप्ती झाली... त्या अतिशय सुंदर क्षणाला त्याच्या अंतरंगात आणि बाह्यरंगात काय झालेलं असणार... कारण तो आता संसार सोडून फिरणारा सिद्धार्थ नव्हता... बोधिसत्वाकडे झुकलेला कोणी तपस्वीही नव्हता... मार लढाईत लढणारा योद्धाही नव्हता... तो बुद्ध बनला... तो निसर्ग बनला आणि दुःखमुक्तीचा आजरामर सिद्धान्त बनला... याची जाणीव त्याला झाली. तेव्हा त्याच्या अंतरंगात चेतना, भावना आणि संवेदनांचा एक महाजल्लोष सुरू झाला... मारांपासून म्हणजे सर्व विकार, तृष्णा यांच्यापासून मुक्त झालेले त्याचं मन उजेड बनलेले असणार... आणि एक अभूतपूर्व महाकाव्यच जन्माला आलं असणार (मलपृष्ठावरून)